मुंबई: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसत नाही. राज्यात आज पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईत पाच आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १५९वर गेली आहे.
राज्यात आतापर्यंत करोनाचे १५९ रुग्ण आढळले असून करोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका दीड वर्षाच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर काल हिंदुजा रुग्णालयात एका ८२ वर्षीय डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकूण १७ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात सांगलीतील १२ जणांचा समावेश होता, तर नागपूरमधील ५ जणांचा समावेश होता.
दरम्यान, देशभरात करोनाचे १९ नवे रुग्ण आढळल्याने देशातील करोना रुग्णांची संख्या ८३४वर पोहोचली असून देशात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातच करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला
राज्यात करोनाचे सहा नवे रुग्ण; मुंबईत ५ तर, नागपूरमध्ये एक
• SANGAM KOTALWAR