मुंबई : मला हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधू नकाअशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनात होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी राज यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.९ फेब्रुवारी रोजी मनसेचा सीएए आणि एनआरसी समर्थनात मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आज राज ठाकरेंनी बैठकी बोलावली होती. मात्र, अवघ्या दहा मिनिटांच्या चर्चेनंतर ही बैठक संपली.२३ फेब्रुवारीला मनसेचं राज्यव्यापी महाअधिवेश झालं. यावेळी राज ठाकरे यांनी आपली बदलती भूमिका जनतेसमोर मांडली. तसेच त्यांनी मोदी सरकारच्या सीएए आणि एनआरसी कायद्यांनाही पाठिंबा दिला.पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून लावायला हवं. पूर्वीपासूनच माझी ही भूमिका आहे. त्यामुळे या कायद्यांच्या समर्थनात मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी भाषणात दिली होती. यापुढे समाजसेवक म्हणून
थोडक्यात मला हिंदुहृदयसम्राट म्हणून संबोधू नका; राज ठाकरेंच्या सूचना