यापुढे समाजसेवक म्हणून | काम करणार- पंकजा मुंडे

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली आहे. यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठवाड्याच्या प्राणी प्रश्नावर भाष्य केलं.मराठवाड्याच्या प्रश्नांवर तोडगा निघायला हवा. मराठवाड्यासमोर अनेक प्रश्न आहेत. वेळोवेळी आपल्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापुढे मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.मी भाजप नेत्या आहेच. पण लोकांमध्ये जाऊन काम करणं महत्वाचं आहे. मला लोकांच्या मनात राहायचं आहे, इतर कोणतीही जागा माझ्यासाठी प्रिय नाही, असं पंकजा म्हणाल्या. तसेच सरकारवर आत्ताच टीका करणार नाही. कारण या सरकारला येऊन जेमतेम १००-१२० दिवस झाले आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.पक्ष सोडण्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पंकजांनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच उपोषणाला उपस्थिती लावलेल्या भाजन नेत्यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान, उपोषणाला देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती लावली होती.